पालकमंत्रिपदावरुन अजूनही कुरबुरी सुरू आहेत. आता पालकमंत्रिपदावरुन नरहरी झिरवळांनी नवी तक्रार केलीय.गरिबाला गरीब जिल्हा का दिला, असा झिरवळांचा सवाल आहे. असं म्हणून खरं तर झिरवळांनी हिंगोलीचा अपमानच केलाय. झिरवळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांनीही झिरवळांचे कान टोचलेत.