बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान होत असून ही संपूर्ण निवडणूक एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार पार्थ पवार यांनी दिली आहे. 21 पैकी 21 जागा आमचा जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा पार्थ पवार यांनी म्हटलंय. आज सोमेश्वर साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या जागांसाठी मतदान होत आहे आणि पार्थ पवार देखील विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत..