भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; PM Modi यांचं आवाहन | NDTV मराठी

नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील कार्यक्रमातून स्वदेशीचा नारा दिलाय. याशिवाय व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणा, असं आवाहन देखील केलं.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केलेली असताना नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा देणं महत्त्वाचं मानलं जात आहे. कोणत्याही भारतीयाच्या घामातून आणि प्रयत्नांतून तयार झालेली कोणतीही वस्तू म्हणजे स्वदेशी आहे अशी स्वदेशीची व्याख्या मोदींनी केलीय... नागरिकांनी व्होकल फॉर लोकल हा मंत्र आचरणात आणावा असे आवाहन त्यांनी देशाला केलंय.

संबंधित व्हिडीओ