ठाण्यातील स्वर्गीय बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर इथं झालेल्या प्रो गोविंदा सिझन तीनच्या पूर्व पात्रता फेरीत गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. बत्तीस संघांनी दमदार खेळ कौशल्याचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अंतिम फेरीत निवड झालेल्या सोळा संघांचे अजून दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे.