आदिवासी मंत्र्यांच्या निष्क्रियतेविरोधात नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील शिक्षकांच्या नियमितीकरणाच्या मागणीसाठी आंदोलक गेल्या ३५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलकांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.