टोमॅटोचं हब असलेल्या पुण्यातील नारायणगाव बाजारात टोमॅटो एकेकाळी दोनशे रुपये प्रति किलोने विकला गेलाय, मात्र आता टोमॅटोचे दर थेट अडीच रुपयांपर्यंत घसरलेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आलीये. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर ढासळलेत, परिणामी कालच्या बाजारात अडीच ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागलेत. मुद्दल ही हातात येत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय.