आवक कमी, भाव वाढले; मार्केट यार्डमध्ये हापूस आंबा दाखल, 3 हजार रुपयांनी आंब्याची विक्री

फळांचा राजा असलेल्या आंब्याचे उत्पादन यंदा घटल्याने अवाक कमी झाली आहे...परिणामी यंदा मराठी नूतन वर्ष म्हणजेच चैत्र पाडव्याला आंब्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.पुण्यातील मार्केटयार्डमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे...मात्र अजून फळ तयार झालेले नाही त्यामुळे दरवर्षी प्रमाणे खरेदीचे प्रमाण सुद्धा कमी झालं आहे.दुसऱ्या बाजूला, आंबा कमी असला तरी सुद्धा काही नागरिक पाडव्याला फळ घरी नेण्यासाठी सकाळीच मार्केटमध्ये गर्दी करतायत.पुण्यात ३००० रुपये डझन हापूस आंब्याची विक्री होतेय तर पेटीचे दर सुद्धा यंदा वाढलेत.पुण्यातील मार्केटयार्डमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी.

संबंधित व्हिडीओ