Pune| जुन्नर दुष्काळामुळे ट्रॅक्टर विक्रीला फटका, ट्रॅक्टरच्या विक्रीत 70% घट होण्याची शक्यता

शेतीसाठी समृद्ध मानल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थितीचा फटका आता कृषी साहित्याच्या बाजारपेठेलाही बसू लागला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर खरेदीला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे., ट्रॅक्टर विक्रीत तब्बल ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी नव्या ट्रॅक्टरच्या खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहेत. याचा परिणाम ट्रॅक्टर विक्रेत्यांसह शेतीशी संबंधित व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळातही बाजारपेठेतील उत्साह कमी राहण्याचे चित्र दिसत आहे. Pune | Drought in Junnar hits tractor sales; a 70% decline in sales is expected.

संबंधित व्हिडीओ