गोकुळ निवडणुकीसाठी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असून 1 वाजेपर्यंत 44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्व मतदान केंद्रांमध्ये कागल मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान झालं आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंच्या पॅनलकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असून, त्यामुळे मतदान केंद्र परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.