पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या ऐतिहासिक आणि मोठ्या मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सवात साकारली जाते आणि याच मंदिरात भक्तांचा लाडका बाप्पा विराजमान होतो.. यंदाच्या वर्षी देखील तीच परंपरा जपत केरळच्या पद्मनाभ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून करण्यात आली आहे.. बप्पा यंदा ज्या मंदिरात विराजमान होतील ते मंदिर 111 फूट उंचीच हे मंदिर असून सुरेख रेखीव आणि डोळ्याचं पारणं फेडणार नक्षीकाम या मंदिराला करण्यात आल आहे..