Pune| बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक, पुणे पोलिसंना यश | NDTV मराठी

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी सुरज उर्फ बापू दशरथ गोसावीला अखेर बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. तब्बल सात महिन्यांपासून बापू गोसावी हा पोलिसांना गुंगारा देत होता, अखेर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या पथकाने बापू गोसावी ला अकलूज मधून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गजाआड केले. ..मागील सात महिन्यांपूर्वी सासवड शेजारील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाला होता आणि या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार होता.तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत होता अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

संबंधित व्हिडीओ