Raigad,Nashik पालकमंत्रिपदाचा वाद पेटणार? नाशिकमधून Dada Bhuseयांना डावललं? गिरीश महाजन काय म्हणाले?

येणाऱ्या काळात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद वाढण्याची शक्यता आहे.याचं कारण 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी राज्य सरकारने परिपत्रक जारी करण्यात आलंय. त्यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत.. रायगड आणि नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील एकाही मंत्र्याचं ध्वजारोहणाच्या यादीत नाव नाही. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी वाढल्याचं दिसतंय. रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्यानं यंदाही शिवसेनेच्या भरत गोगावलेंना स्थान दिलं नाही.. त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चा आहे. भरत गोगावले राज्याबाहेर असल्यानं आज कॅबिनेट बैठकीलाही उपस्थित राहणार नाहीत.तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तिढा आहे.. पण अद्याप कुणालाही तिथलं पालकमंत्रीपद दिलेलं नाहीए. 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंचं नाव नाहीए.. त्यांच्याजागी सुरक्षित खेळी करत भाजपनं गिरीश महाजनांना संधी दिली. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीच्या तटकरेंचं ध्वजारोहणासाठी नाव पुढे करत शिंदे गटाला डावलण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

संबंधित व्हिडीओ