Dhule Rain Update | धुळे जिल्ह्यात पावसाची हजेरी, पिकांना नवसंजीवनी | NDTV Marathi

Dhule Rain Update | धुळे जिल्ह्यात पावसाची हजेरी, पिकांना नवसंजीवनी | NDTV Marathi Rain visits Dhule district; crops get a new lease of life. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने माना टाकलेल्या पिकांना काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध भागात पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचले.

संबंधित व्हिडीओ