राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक रस्ते आणि वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.