जलयुक्त शिवार योजनेचा Nagpur जिल्ह्यातील रिॲलिटी चेक, 45 डिग्री तापमान तरीही शिवारात भरपूर पाणी!

विदर्भात 45 डिग्रीवर तापमान गेले आहे.अशात नद्या कोरड्या पडणे अपेक्षित असताना कित्येक ठिकाणी एक चमत्कारी दृश्य पाहायला मिळते आहे.गेल्या वर्षी जिथे जल युक्त शिवार अभियानाची कामे झाली तिथे एकाच वर्षात प्रचंड बदल झाला आहे.गावाजवळच्या नदीत भरपूर पाणी दिसते आहे, विहिरींची पातळी मोठ्या फरकाने वाढली आहे आणि नदीच्या पाण्यात भर उन्हात बगळे खेळताना दिसत आहेत.ही बाब उघडकीस आली जेव्हा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील तीन गावांमध्ये जल युक्त शिवार योजनेचा रिॲलिटी चेक केला.नागपूरच्या उमरेड, काटोल आणि पारशिवनी भागात केलेला हा रिऍलिटी चेक पाहूया.

संबंधित व्हिडीओ