ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील युनुस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेखने विरोधकांना डिवचलं होतं.. सहर शेख हिच्या वडिलांना आपल्या पक्षात मानाचे पान दिल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.. युनुस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटोही समोर आलाय.. युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.. ही नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे.