विशाळगड प्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांच्यासह पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल झालाय. एकवीस संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशाळगडावरती अतिक्रमण काढण्यासाठी रविवारी हजारो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. थेट दृश्य आपण बघतोय NDTV मराठी वरती ही exclusive दृश्य आहेत. अतिक्रमण हटाव ही मोहीम एकीकडे राबवली जाते आणि त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि त्या बरोबरीने संभाजी राजे छत्रपती आक्रमण झाले याच प्रकरणामध्ये पन्नास ते साठ जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. एकवीस संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. त्याच बरोबरीने संभाजी राजे छत्रपती यांच्यावरतीही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.