संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेमधील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणांन ऍसिड हल्ला केला आहे. या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्यामुळे या मुलीला लोणीच्या प्रवारानगर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले आहे. सहावीमध्ये शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यानंतर वडगाव पान गावच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एक युवकांन येऊन तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकले. या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहे .आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम पोलिसांकडून सुरुय.