भंडारा येथील लाखनी ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण नसलेल्या सफाई कामगाराने रुग्णाला थेट इंजेक्शन दिले. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निष्काळजीपणाचाही पर्दाफाश झाला आहे.