पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच हत्येची सुपारी दिल्याची माहिती मिळते आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या अक्षय जवळकर यांच्यासोबत प्रेम संबंध होते असं पोलीस तपासात उघडच आहे.