आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडयाला सुरुवात होणार आहे.आजपासून 2025-26 च्या पुरवणी मागण्यांवरती चर्चेचा पहिला दिवस असणार आहे.या आठवड्यात काही महत्त्वाचे विधेयक पटलावर ठेवण्यात येणार आहेत.या आठवड्यात विशेष सुरक्षा विधेयकावर चर्चेला सुरुवात होणर आहे. दरम्यान कृषी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची करण्यात येत असलेली फसवणूक यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.शिवाय विधान परिषदेत हक्कभंग समितीकडून आज कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्क भंगाची नोटीस दिली जाणार आहे.