उद्यापासून दोन दिवस शरद पवार गटाच्या मुंबई विभागाची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत ही बैठक होणार आहे.उद्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई तर मंगळवारी दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईची बैठक पार पडणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.. गेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीने 57 जागा लढल्या होत्या. यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मात्र वेगळी परिस्थिती आहे.. यंदा महाविकास आघाडी म्हणून लढायचं की वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत बैठकीत खलबत होण्याची शक्यता आहे.