. एसटी भाडेवाढीवरून ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे. राज्यभरात एसटी ची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्या विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. ठाकरे गटाचं हे आंदोलन राज्यव्यापी असणार आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यात मध्यवर्ती बस स्थानकामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. सकाळी अकरा वाजता अंबादास दानवेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाला सुरुवात होईल. ए म्हणजे सर्वसामान्य माणसाची एसटी असते. याच्यावर तब्बल पंधरा टक्के भाडेवाढ आता सरकारने केलेली आहे आणि आश्चर्य सरकारच्या या खात्याच्या मंत्रालयात भाडेवाढीविषयी कोणतीही जाणीव नाही. आणि म्हणून, सोमवार रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता मराठवाड्यातल्या सगळ्या तालुका जेवढे बस स्थानक आहे या ठिकाणी शिवसेनेनं सकाळी अकरा वाजता भाडेवाडी विरुद्ध चक्का जाम आंदोलन ठेवलेलं आहे.