लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी. कारण महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर झालंय. आता या विधेयकानंतर महिलांनाही शेतकरी म्हणून स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार आहे. स्वतंत्र ओळख नसल्याने गाव खेड्यातल्या महिलांवर कायम अन्याय होत होता. शेतात काम करणाऱ्या महिलांकडे कायम शेतमजूर म्हणूनच ओळखलं जात होतं. महिलांच्या नावावर शेतजमीन असण्याचं प्रमाणही कमी होती. त्यामुळे राज्यात कागदोपत्री महिलांची शेतकरी म्हणून ओळख नव्हती. मात्र आता राज्य सरकारने याच महिलांसाठी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर झाल्याने राज्यातील महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला अशी ओळख मिळणार आहे.