व्हॉटसअप म्हणजे संवादासाठी सध्याचा जलद पर्याय. व्हॉटसअप सतत आपल्या युझर्ससाठी नवनवे फिचर्सही आणत असतो. असंच एक नवं फिचर व्हॉटसअप आणणार आहे. मात्र हे नवं फिचर युझर्सच्या सोयीचं ठरण्याऐवजी त्यांच्यासाठी धोकादायक अधिक ठरण्याची शक्यता आहे. ऑनलाईन फसवणुकीचा हा सायबर भामट्यांसाठीच नवा पर्याय ठरण्याची भीती खुद्द भारत सरकारलाही वाटत आहे. काय आहे हे नवं फिचर आणि त्याचे फायदे काय आणि तोटे काय पाहूया एक सविस्तर रिपोर्ट.