भिवंडीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर पडघा येथील टोल कंपनी कडून टोल वसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे पुन्हा रस्त्यावर उतरलेत.