MIMचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी अल्जीरिया दौऱ्यावर आहेत.पाकचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी तयार केलेल्या शिष्टमंडळात ओवैसीही आहेत.यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाने अल्जीरियात पाकिस्तानची पोलखोल केली.जकीउर रहमान लखवी नावाचा दहशतवादी पाकिस्तानच्या कारागृहात असताना बाप बनला आहे. जगभरात कुठेही दहशतवाद्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला कारागृहाच्या बाहेर जात येत नाही. परंतु लखवी कारागृहात असताना एका मुलाचा बाप बनला.त्यानंतर पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे लखवीवरील खटला पुढे सुरु झाला.असं ओवैसी यांनी म्हटलंय.