Tribhasha | त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच, Dr.Narendra Jadhav यांचं स्पष्ट मत | NDTV मराठी

त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून सुरू करावी, असे स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत डॉ. जाधव बोलत होते. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाला. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांनी घेतल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे अध्यादेश रद्द केले. त्यानंतर जून महिन्यात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालाबाबत डॉ. जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

संबंधित व्हिडीओ