आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखा भेटी सुरू केल्यात. आज त्यांनी दहिसर येथे शाखा क्रमांक 4 ला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी काळ्या मांजरांचा बंदोबस्त कर असं गणरायाला साकडं घातलंय. तर धोका देणाऱ्यांचं डोके फुटेल पण शिवसेना फुटणार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय.