धारावीतील एकूण 10 शाळांमधील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वप्नातली धारावी रेखाटत प्रजासत्ताक दिन साजरा केला. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धारावी सोशल मिशन या उपक्रमांतर्गत आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कामराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी, ' माझ्या स्वप्नातली धारावी' हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.'तुम्हाला तुमच्या स्वप्नातली 2050 पर्यंतची धारावी नेमकी कशी दिसते?' या प्रश्नाचे उत्तर अतिशय कल्पकतेने धारावीतील विद्यार्थ्यांनी चित्रांमधून रेखाटले. भविष्यातील धारावी नेमकी कशी असावी, याबाबतच्या असंख्य कल्पना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडल्या. सर्व स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने रंगपेटी आणि इतर आवश्यक सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली.