अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारनं दोन मजुरांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दुसरा गंभीर जखमी आहे. यामध्ये उर्मिला कोठारे आणि कार चालकालाही दुखापत झाली आहे. शूटिंग नंतर ती घरी परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळतीये. कांदिवली परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला.