Parbhani Flood | पूर्णा तालुक्यात अतिवृष्टी, शेतकरी दुहेरी संकटात

परभणी जिल्ह्यातील पूर्णा-पालम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पूर्णा तालुक्यातील नावकी गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतामध्ये पाणी शिरल्याने उभी पिके नष्ट झाली आहेत, तर दुसरीकडे घरातील सामान खराब झाल्याने जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. काल रात्री सुरू झालेल्या पावसाने गावात हाहाकार माजवला असून नदीकाठच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीवर आमच्या प्रतिनिधी दिवाकर माने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

संबंधित व्हिडीओ