ऑपरेशन सिंदूरनंतर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत क्रिकेटचा रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्याला राजकीय विरोध होत असतानाही क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. भारत हा सामना नक्कीच जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींनी यासाठी एक अनोखी प्रार्थना केली आहे. स्थानिक परंपरेनुसार, त्यांनी भारताच्या विजयासाठी विशेष 'गाऱ्हाणं' घातलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर'प्रमाणेच भारतीय संघ पाकिस्तानचा धुव्वा उडवेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.