बीडच्या मस्साजोगमध्ये 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होणार आहे.सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार असून याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्याने आणि त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आज ही सुनावणी केज न्यायालयात होणार आहे.