खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.त्या बाबतीत पुष्टी देणारे तीन आलिशान गाड्या गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे महामार्गावरुन तीन आलिशान गाड्या मधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे.बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले.हे देखील सीसीटीव्हीत दिसतंय.