आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता वाशिम जिल्ह्यातही दिसून येत आहे. घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गॅस टंचाईची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून जळाऊ लाकडाची मागणी वाढली असून गरीबांसोबतच मध्यमवर्गीय नागरिकही लाकडाच्या वापराकडे वळताना दिसत आहेत.यासंदर्भात जळाऊ लाकडाच्या वाढत्या मागणी बाबत आरामशीन टिंबर व्यापारी यांच्याशी सविस्तर बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.