शेतीमाल विक्रीचं शेतकऱ्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या. मात्र, गेल्या काही वर्षात संचालक मंडळांचे भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची होणारी कुचंबना यामुळे बाजार समिती बदनाम झाली. त्यावर उपाय म्हणून निवडक बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार कोणकोणत्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळेल? राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानं बाजार समितीत काय फरक पडेल? त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत... पाहुया