कोर्टाच्या आदेशानंतर पुढची भूमिका काय? पुण्यातील MPSC आंदोलनातून Rohit Pawar NDTV मराठीवर LIVE

MPSC आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासाकडे लक्ष द्यावं, असा सल्ला उच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान दिलाय. याचवेळी आंदोलक किंवा विद्यार्थी म्हणजे कुणी समाजविघातक घटक नसल्याचं स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. विदयार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या तीन आठवड्यांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान दिलेत. मात्र, न्यायालयाच्या सल्ल्यानंतरही आमदार रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. उलट, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी मोठं होईल, असा इशाराच त्यांनी दिलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे...

संबंधित व्हिडीओ