अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात अर्थखातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. या अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येईल असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला होता.. मात्र याच मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेलांनी काहीशी सावध भूमिका घेतलीय. अर्थखात्याचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच घेतील अस प्रफुल्ल पटेलांनी सांगितंलय.