राज्य सरकारकडे तब्बल ८० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे कंबरडे मोडलेल्या राज्यातील कंत्राटदारांमध्ये एका नव्या घोटाळ्यानं खळबळ उडाली आहे.ग्राम विकास विभागाच्या २५/१५ या योजनेअंतर्गत विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचं एक बनावट शासन निर्णय उजेडात आले आहेत. धक्कादायक म्हणजे या बनावट शासन निर्णयांच्या जीआर आधारे अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्राम विकास विभागाने तातडीने याची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व जिल्हा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच अहिल्यानगर प्रकरणात जबाबदार असलेल्यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.