जाहिरात

चीनी फोनचा खेळ खल्लास! 'हा' स्मार्टफोन मार्केट करणार जाम, 10000mAh बॅटरी, 12 GB रॅम अन् बरंच काही..

रिअलमी लवकरच या स्पर्धेत उतरून 10,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

चीनी फोनचा खेळ खल्लास! 'हा' स्मार्टफोन मार्केट करणार जाम, 10000mAh बॅटरी, 12 GB रॅम अन् बरंच काही..
realme 10000mah battery smartphone

Realme RMX5107 Specifications : रिअलमीने 10,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन आणण्याची घोषणा केली होती.परंतु,लॉन्चच्या बाबतीत रिअलमी चीनी कंपनी Honor पेक्षा मागे पडले आहे. कारण Honor चा नवीन स्मार्टफोन आधीच मार्केटमध्ये आला आहे. सध्या मार्केटमध्ये ग्राहकांसाठी Honor Win आणि Win RT हे मोबाईल फोन उपलब्ध आहेत.जे 10,000mAh बॅटरीसह येणारे पहिले स्मार्टफोन आहेत. एका ब्लॉगिंग साइटच्या रिपोर्टनुसार, रिअलमी लवकरच या स्पर्धेत उतरून 10,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजही मिळणार

एका रशियन ब्लॉगिंग साइटने रिअलमीच्या आगामी स्मार्टफोनचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 10,001mAh क्षमतेची बॅटरी उपलब्ध आहे.या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RMX5107 असा आहे. या स्मार्टफोनला हाय-रेस ऑडिओ सर्टिफिकेशनही मिळाले आहे. हा फोन ऑपरेटिंग सिस्टिमच्या बाबतीत Realme UI 7.0 वर चालतो. यात 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजही देण्यात आले आहे. या कॉन्फिगरेशनशिवाय इतर पर्यायही येऊ शकतात.या स्मार्टफोनला युरोपच्या EEC कडूनही मंजुरी मिळाली आहे,ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. 

नक्की वाचा >> 15 आठवड्यांत केलं 22 किलो वजन कमी, घरीच बनवा 'ही' Fat Loss सुपर ड्रिंक, फिटनेस ट्रेनरने शेअर केला व्हिडीओ

स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल

सध्या Realme 15T 5G आणि Realme Narzo 80 सारखे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे. आता कंपनी थेट 10,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत कंपनीला थेट 10,000mAh बॅटरीसाठी मोठे बदल करावे लागतील. विशेषतः स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये मोठा बदल करावा लागेल,कारण बॉडीमध्ये इतर पार्ट्सही बसवावे लागतात.

नक्की वाचा >> फ्रिजमध्ये ठेवलेलं दही किती दिवस ताजं राहतं? ते दही कधी खाऊ नये? फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com