जाहिरात
This Article is From May 20, 2024

12 वर्षांच्या मुलीने नायट्रोजन पान खाल्लं, थेट ऑपरेशन करण्याची पाळी आली

अनन्याने म्हटले की, "मला स्मोकी पान खायचं होतं. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. इतर अनेकजण ते पान खात होते. कोणालाही त्रास होत नव्हता. मला मात्र भयानक वेदना होत होत्या."

12 वर्षांच्या मुलीने नायट्रोजन पान खाल्लं, थेट ऑपरेशन करण्याची पाळी आली
प्रातिनिधिक फोटो

फायर पान, नायट्रोजन पान असे पानाचे निरनिराळे प्रकार मिळायला लागले आहेत. पान खाताच तोंडातून धूर येत असल्याने या पानाची मोठी क्रेझ आहे. अनन्या नावाच्या 12 वर्षांच्या मुलीला हे पान खाण्याची खूप इच्छा होती. तिने हे पान खाल्लं आणि त्यानंतर तिला ज्या वेदना व्हायला लागल्या त्या शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही अशा होत्या. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अनन्याला हे पान खाल्ल्यानंतर पोटात दुखायला लागलं. ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणी केली असता डॉक्टरांनी सांगितलं की अनन्याला पोटाला आतून इजा पोहोचली आहे. या पानामुळे पोटाच्या आत एक छिद्र पडल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनन्या घडला प्रकाराबद्दल बोलताना म्हटले की, "मला स्मोकी पान खायचं होतं. मला ते खूप इंटरेस्टींग वाटत होतं. इतर अनेकजण ते पान खात होते. कोणालाही त्रास होत नव्हता. मला मात्र भयानक वेदना होत होत्या." अनन्याला एचएसआर लेआऊट परिसरातील नारायण मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की अनन्याला पोटात आतमध्ये छोटे छिद्र पडले आहे. अनन्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. 

नक्की वाचा- रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड

अनन्यावर डॉक्टरांनी इंट्रा-ऑप ओजीडी स्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी आणि एक्स्पोरेटरी लॅपरोटोमीद्वारे इलाज केले. डॉक्टरांनी याबाबत बोलताना म्हटले की, इंट्रा-ऑप ओजीडी स्कोपीमध्ये एंडोस्कोप, कॅमेरा आणि लाईट असलेली एक ट्यूब पोटाच्या आत कुठे इजा झाली आहे आणि ती किती आहे हे तपासण्यासाठी सोडली जाते आणि मग शस्त्रक्रिया केली जाते. अनन्या 6 दिवस रुग्णालयात होती. एक पान खाल्ल्याने तिला वेदना सहन कराव्या लागल्या, रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि शस्त्रक्रियाही सहन करावी लागली. 

( नक्की वाचा : शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग )

नारायण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की लिक्विड नायट्रोजन खाल्याने इजा होऊ शकते. लिक्विड नायट्रोजनचे पटकन बाष्पीभवन होते. यामुळे शरीराला तो हानीकारक ठरू शकतो. नायट्रोजनमधून निर्माण होणारा धूर नाकावाटे शरीरात गेल्यास श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com