जाहिरात

Bandana Girl Viral Video : सेल्फी व्हिडीओ बनला जगातील सर्वात मोठा ट्रेंड, लोकांना लागलंय तरुणीचं वेड!

सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. फॅन फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक जण नको ते उद्योग करत असतात.

Bandana Girl Viral Video : सेल्फी व्हिडीओ बनला जगातील सर्वात मोठा ट्रेंड, लोकांना लागलंय तरुणीचं वेड!
Bandana Girl Effect Trend
मुंबई:

Bandana Gir Effect Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. फॅन फॉलोईंग वाढवण्यासाठी आणि प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक जण नको ते उद्योग करत असतात. म्हणजेच भर रस्त्यात सेल्फी किंवा व्हिडीओ काढून त्या एडिट करून इंटरनेटवर व्हायरल करणं.एका तरुणीनेही तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला. पण या व्हिडीओत असं काय खासं होतं, जे पाहून लोकांना या तरुणीचं वेडच लागलं. म्हणजे अनेकांनी या तरुणीचा इंटरनेटवर शोधच सुरु केला. जणू काही अख्ख जगच या तरुणीला शोधत होतं. पण नंतर काही नेटकऱ्यांनी यात असं काय खास होतं?" असा ट्रेंड सुरु केला. 

बंदाना गर्ल इफेक्ट 'हा' ट्रेंड आहे तरी काय?

डिजिटल युगात नवा नियम सुरु करणारा हा ट्रेंड अचानक 2 नोव्हेंबरला सुरु झाला.एक्सवर @w0rdgenerator नावाच्या एका युजरने हा 2 सेकंदांचा सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, जणू काही संपूर्ण डिजिटल युगात हाच ट्रेंड सुरु आहे. ना कोणता फिल्टर, ना कोणती एडिटिंग,फक्त एका ऑटो रिक्षामध्ये बसलेल्या मुलीची नैसर्गिक झलक. या व्हिडिओमध्ये लाईटिंग परफेक्ट नाही,कॅमेरा स्थिर नाही,पण खरी गोष्ट काय होती? रिअलनेस. सोशल मीडियावर आपण सगळे ‘परफेक्ट लाइफ'पाहण्याची-ऐकण्याची सवय लावून घेतली आहे.अशा वेळी एका तरुणीचा मेकअपशिवायचा साधा क्षण लोकांच्या नजरेत भरला आहे. 

नक्की वाचा >> 90 च्या दशकातील 'ऐश्वर्या', 31 वर्षानंतर 'हा' फोटो झाला व्हायरल! लोक म्हणाले, "आजही राजकुमारीच.."

इथे पाहा बंदाना गर्लचा व्हायरल व्हिडीओ

क्रिएटर्स तासन्‌तास शूट करूनही जे मिळवू शकले नाहीत,ते या २ सेकंदांच्या क्लिपने साध्य केले.म्हणूनच मार्केटिंग आणि ट्रेंड एक्स्पर्ट्स याला ‘बँडाना गर्ल इफेक्ट' म्हणत आहेत.एक असं उदाहरण जे दाखवते की अल्गोरिदम नेहमी परफेक्शनला नाही,तर इमोशनला रिवॉर्ड देतो.‘बँडाना गर्ल'ने क्रिएटर्सना एक गोष्ट शिकवली.खरे राहा,खोटा मुकूट घालून फिरू नका.इंटरनेट आता त्या टप्प्यावर आहे, जिथे रिअल क्षण हीच नवी करन्सी आहे, असं डिजिटल युगातील लोकांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> ऋतिकसोबत बॅकग्राऊंड डान्सर, 'तो' 27 वर्षात बनला सुपरस्टार, 34 व्या वर्षी मृत्यू, TV अभिनेत्रीसोबत होतं लफडं..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com