जाहिरात

Viral News: धावत्या कारच्या बोनेटवर चढली महिला, कार थेट पोलिस स्टेशनमध्ये अन् पुढे जे घडलं ते...

आता करायचे काय असा प्रश्न कारमधील मुलीला आणि तिच्या पतीला पडला होता.

Viral News: धावत्या कारच्या बोनेटवर चढली महिला, कार थेट पोलिस स्टेशनमध्ये अन् पुढे जे घडलं ते...
अहिल्यानगर:

सुनिल दवंगे

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या धक्कादायक घटनेचा थरारक व्हिडीओ ही समोर आला आहे. भररस्त्यात एका महिलेने धावत्या कारच्या बोनटवर चढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यामागचे कारण समजल्यानंतर सर्व जण आवाक झाले आहेत. 

जी महिला गाडीच्या बोनेटला लटकली होती, तिच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत लग्न केलं होतं. तीने  घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. या विवाहासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलगी आणि तिचा पती श्रीरामपूर न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर दोघेही कारमधून निघाले होते. त्याच वेळी मुलीच्या आईने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा - Kalyan News: 'तडीपार करा पण मला जेलमधून बाहेर काढा',मारकुटा रमेश म्हात्रे कोर्टात असं का म्हणाला?

मात्र कार चालकाने वाहन न थांबवल्याने मुलीची आई संतापली. त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट धावत्या कारच्या बोनटवर चढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या थरारक प्रकारामुळे रस्त्यावर उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित केला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. शेवट पर्यंत ती महिला त्या गाडीच्या बोनेटवरून खाली उतरली नाही. त्यामुळे गाडीत असलेल्यांचा ही काळजाचा ठोका चुकला होता. 

नक्की वाचा - Pune News: पार्थ पवारांच्या साखरपुड्याचं निमंत्रण कुणा-कुणाला? पाहुण्यांची यादी आली समोर, शरद पवारांना...

आता करायचे काय असा प्रश्न कारमधील मुलीला आणि तिच्या पतीला पडला होता. अशा वेळी कार चालकाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहन थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवाय दोन्ही कुटुंबाना समजावण्याचा प्रयत्न ही केला. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com