जाहिरात

ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी 5 मुलींच्या गप्पा रंगल्या..बाजूला बसलेल्या प्रवाशाची नियत फिरली, घाणेरड्या नजरेनं..

नमध्ये प्रवास करताना अनेकदा इतर प्रवाशांच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांना विविध प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. नुकतच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी 5 मुलींच्या गप्पा रंगल्या..बाजूला बसलेल्या प्रवाशाची नियत फिरली, घाणेरड्या नजरेनं..
5 girls train video viral

Women Shocking Train Video :  ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा इतर प्रवाशांच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांना विविध प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. नुकतच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.व्हिडीओत पाहू शकता की, 5 मुली पश्चिम बंगालच्या सिलीगुडीहून आसामला जात असतात. हा प्रकार संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. ट्रेनमध्ये 5 मैत्रिणी ऐकमेकांशी बोलत होत्या आणि प्रवासाचा आनंद घेत होत्या. त्यांच्या गप्पा रंगल्या असतानाच बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला त्यांचा त्रास होऊ लागला. त्याने या मुलींना शांत बसण्याची विनंती न केली नाही. तो उद्धट पद्धतीने त्यांच्याशी बोलू लागला आणि त्यांच्याकडे टकमक पाहू लागला. इतकच नाही, तर त्याने मुलींना तक्रार करण्याची धमकीही दिली.

या 5 मुली लोहित एक्सप्रेसने सिलीगुडीहून गुवाहाटीला जात होत्या. याच दरम्यान एक प्रवासी त्यांच्यावर ओरडू लागला. या घटनेबाबत जेरिफा म्हणते,“तेव्हा रात्रीचे 10 वाजलेही नव्हते आणि तो व्यक्ती आम्हाला शांत राहण्यासाठी सांगत होता. त्याने शिवीगाळही केली. त्यानंतर वाद झाला. पण वाद संपल्यानंतरही तो व्यक्ती सतत आमच्याकडे एकटक पाहू लागला. त्याच्या अशा वागणुकीमुळे आम्हाला मानसिक धक्का बसला".

नक्की वाचा >> शिंदेंना शह देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केला CM फडणवीसांना संपर्क? पाहा व्हिडीओ

त्या प्रवाशाने मुलींना धमकी दिली आणि नंतर..

वेस्ट बंगालच्या सिलीगुडीहून आसामला परतणाऱ्या मुली ऐकमेकींसोबत गप्पा मारत होत्या. त्याचवेळी केबिनमध्ये असलेल्या एका प्रवाशाने त्यांच्यासोबत उद्धटपणे बोलणं केलं. त्या प्रवाशाने त्यांच्यासोबत शिवीगाळ सुरू केल्याने प्रकरण चिघळलं. प्रवाशाने मुलींची तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्या मुलीही संतापल्या. इंस्टाग्रामवर @unfilteredjerifa नावाच्या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

"आम्हाला खूपच अस्वस्थ वाटू लागलं".

हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, “आम्ही 5 मुली सिलीगुडीहून आसामकडे प्रवास करत होतो. रात्री 8 वाजताच्या सुमारास आम्ही गप्पा मारत होतो. तेही ट्रेनच्या नियमांनुसार रात्री 10 वाजण्यापूर्वी. अचानक एक माणूस आणि एक महिला आम्हाला शिव्या देऊ लागला. आम्ही शांतपणे उत्तर दिलं तरीही त्याने आम्हाला धमकी दिली. तो व्यक्ती आमच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत होता. ज्यामुळे आम्हाला खूपच अस्वस्थ वाटू लागलं".

नक्की वाचा >> सासू-सासरे, नणंदेसह पतीवर गुन्हा, सुनेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, नवी मुंबईतील संतापजनक घटना

Listen to the latest songs, only on JioSaavn.com