जाहिरात

UPSC Interview: UPSC मुलाखतीत 'हे' 5 प्रश्न हमखास विचारतात, कसं द्याल उत्तर? जाणून घ्या ट्रिक...

मुलाखतीत काही प्रश्न असे असतात जे हमखास विचारले जातात. कोणते आहेत असे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे देताना कशी चलाखी करावी? जाणून घ्या याबाबतची महत्त्वाची माहिती.

UPSC Interview: UPSC मुलाखतीत 'हे' 5 प्रश्न हमखास विचारतात, कसं द्याल उत्तर? जाणून घ्या ट्रिक...

Top UPSC IAS Interview Questions: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षा पास होणे म्हणजे अत्यंत कठीण..  अनेकदा उमेदवार प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा चांगल्या गुणांनी पास होतात मात्र मुलाखतीत फेल ठरतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे स्पर्धा परिक्षेची अपूर्ण तयारी, चालू घडामोडींच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि जनरल नॉलेजचा अभाव. त्यामुळे स्पर्धा परिषेच्या मुलाखतीची अत्यंत काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे आहे. 

युपीएससी परीक्षेचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत. याला व्यक्तिमत्व चाचणी असेही म्हणतात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच UPSC मुलाखतीसाठी निवड केली जाते. युपीएससीच्या मुलाखतीत काही प्रश्न असे असतात जे हमखास विचारले जातात. कोणते आहेत असे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे देताना कशी चलाखी करावी? जाणून घ्या याबाबतची महत्त्वाची माहिती.

Trending News: 'विधवा झाल्याचा फायदा घे, श्रीमंत पुरुष पटव', मुलीची आईकडे मागणी, संतापजनक VIDEO व्हायरल

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे महत्त्वाचे 5 प्रश्न |Top UPSC IAS Interview Questions

1. तुम्हाला IAS अधिकारी का व्हायचे आहे आणि तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली?

या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली ते स्पष्ट करा. बनावट कथा सांगणे टाळा. तुमचे उत्तर जितके खरे असेल तितके ते अधिक अचूक असेल. खोट्या उत्तरांमुळे गुणांचे नुकसान होऊ शकते.

2: तुम्हाला आवडणाऱ्या सध्याच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा.

फक्त अलीकडील राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख करा. तुम्हाला सध्याचे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मुद्दे चांगले आठवतील आणि तुम्ही त्यावर मोकळेपणाने चर्चा करू शकाल.

3: तुम्ही तुमचा वेळेचे नियोजन कसे केले?

तुमच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित उत्तर द्या, जसे की तुम्ही तुमचा वेळ कसा व्यवस्थापित केला आणि यूपीएससीसाठी तयारी कशी केली.

VIDEO: 'मार खायचा नाही', आगरी समाज एकवटला! 'त्या' घटनेनंतर गावागावात मिटिंग

4. तुमची करिअरची ध्येये काय आहेत?

तुमच्या उत्तरांची स्पष्ट उत्तरे द्या. कोणताही गोंधळ नसावा.

5. अलीकडील कोणत्या सरकारी धोरणाने तुमचे लक्ष वेधले आहे?

या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर द्या. घाई करू नका. तसेच, धोरणाबद्दल नकारात्मक टिप्पण्या टाळण्याची काळजी घ्या. संतुलित उत्तर द्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com