अतिशय युनिक, अतिशय वेगळा आमरस डोसा; VIDEO वर नेटिझन्सच्या 'तिखट' कमेंट्स 

बिस्लेरी पाणीपुरी, मॅगी पाणीपुरी, आईस्क्रीम पुरणपोळी, तंदुर वडापाव असे पदार्थ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यात आता 'आमरस डोसा'ची भर पडली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

लोकांना वेगळं काही देण्यासाठी खाद्यपदार्थ विक्रेते वेगवेगळे प्रयोग करत असतात. बिस्लेरी पाणीपुरी, मॅगी पाणीपुरी, आईस्क्रीम पुरणपोळी, तंदुर वडापाव असे पदार्थ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यात आता 'आमरस डोसा'ची भर पडली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'आमरस डोसा'चा हा व्हिडीओ  foodb_unk या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, हा साधा डोसाच आहे. मात्र त्यातील स्टफिंग काहीशी वेगळी आहे. साध्या डोशाचे बॅटर तव्यावर टाकले जात आहे. त्यानंतर त्यावर बटर आणि त्यावर आमरस टाकला जात आहे. त्यानंतर भरभरुन चीज आणि कोथिंबिर मिक्स शेकला जात आहे. 

आमरस डोसा VIDEO

आमरस डोसा शिजल्यानंतर मस्तपैकी ते डिशमध्ये सर्व्ह केला जात आहे. सोबत एका वाटीत चटणीऐवजी आमरस देण्यात येतो. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असले. मात्र हा आमरस डोसा दिसायला तर सुंदर दिसत आहे. मात्र खाणाऱ्यांच्या पसंतीस तो पडेल की नाही, सांगता येत नाही.

(नक्की वाचा- Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 4500 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 650 हून अधिक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहे. हा आमरस डोसा नक्की कुठे मिळतो, व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

Advertisement

(नक्की वाचा- Health Tips: रात्रीच्या जेवणाची ही आहे योग्य वेळ, आरोग्य राहील निरोगी)

नेटिझन्सच्या तिखट कमेंट्स

डोसा आमरस गोड दिसत असला तरी नेटिझन्सने त्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहे. 'आंबे, डोसा आणि चीज वाया गेलं', अशी कमेंट एका युजरने केली आहे. एका युजरने म्हटलं की, 'गरुड पुराणात यासाठी वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे.'

'डोसा आणि आमरसला न्याय द्या', 'हे खाण्याआधी इन्शुरन्स काढा', 'आमरस डोसा बनवणाऱ्याला जन्मठेप व्हायला हवी', अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहे.