महिलांच्या दूचाकी चालवण्यावरुन अनेक विनोद प्रचलित आहेत. महिलांना वाहन चालवण्याच्या पद्धतीवर सोशल मीडियात अनेकदा टीका केली जाते. या सर्व विषयावर अभिनेत्री आणि मराठी बिग बॉसची स्पर्धेक जान्हवी किल्लेकरनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जान्हवीनं तिला कार चालवताना आलेला एक अनुभव सांगणारा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तिनं या सर्व प्रकरणावर प्रश्न विचारले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाली जान्हवी?
महिलांना वाहन चालवता येत नाही, असा समज आहे. त्यावर जान्हवी म्हणाली की,लोक महिलांना काय समजतात, त्यांना काय वाटतं की मुलींना अक्कल कमी असते, हा भेदभाव का आहे? महिलांना काही गोष्टी जमतच नाहीत किंवा आयुष्यात काही गोष्टी त्यांना जमणारच नाहीत, हा भेदभाव आपल्या समाजात का आहे? हा मला प्रश्न आहे.
10 ते 20 टक्के महिलांना कदाचित वाहन चालवता येत नसेल ही मी मान्य करते. अथवा त्यांना वाहन चालताना योग्य जजमेंट येत नसेल. अथवा त्या वाहन शिकत असतील किंवा नुकत्याच शिकल्या असतील, काहीही असू शकतं.
महिलांचे वाहन चालवण्यावर जोक येतात. महिला राईट सिग्नल देऊन लेफ्टला जातात. लेफ्टचा दाखवून राईटला जातात. मुलींच्या वाहन चालवण्यावरुन बरेच जोक येतात. मला असं वाटतं की हे जोक लोकांनी इतके मनावर घेतले आहेत की त्यांना वाटतं महिलांना वाहन चालवताच येत नाही. हा किती मोठा गैरसमज आहे आणि का आहे? हे मला कळत नाही, असा संतप्त सवाल जान्हवीनं विचारला.
( नक्की वाचा : Black Warrant : 40 वर्षांनी पुन्हा ताजं झालेलं रंगा-बिल्ला प्रकरण काय आहे? त्यानंतर दिल्ली कशी बदलली? )
जान्हवीनं यावेळी स्वत:चा एक अनुभव सांगितला. आज एक किस्सा माझ्यासोबत झाला म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा वाटला. मी मुंबईत वाहन चालवत असताना रस्ता पूर्ण खोदला होता. त्यामुळे तिथून एकच वाहन जाऊ शकत होतं. तिथंच एक ट्रक उभा होता. त्यामुळे अन्य कार जाणे शक्य नव्हते. लोकांनी मला कार पुढे नेण्याचा आग्रह केला. पण, मी त्यांना कार पुढं जाणार नाही, असं सांगितलं. इतक्या अरुंद जागेतून कार काढल्यावर महागड्या कारचा स्क्रॅच गेला किंवा अन्य नुकसान झालं ते हे भरुन देणार आहेत का? नाही. त्यापेक्षा दोन मिनिटं थांबा. पण, लोकांना धीर नसतोच.
त्यावेळी एकानं मला कार चालवता येत नाही तर चालवता कशाला? असा टोमणा लगावला. माझ्या जागी एक पुरुष असता आणि त्यानं माझ्यासारखंच कार पुढं जाणार नाही, असं उत्तर दिलं असतं तर लोकांनी ते ऐकूण घेतलं असतं. मुलींना अक्कल नसते. त्यांना वाहन चालवण्याचा सेन्स नसतो, हा समाजातील भेदभाव कधी कमी होणार? असा प्रश्न अभिनेत्रीनं यावेळी विचारला. जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world