एमबीए, डॉली चहावाल्यानंतर 'मॉडेल चहावाली'चा सोशल मीडियावर धुमाकूळ; काय आहे हटके अंदाज?

इन्स्टाग्रामवरील thehungrypanjabi च्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये चहाच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. या व्हिडिओवर यूजर्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एक कोटीहून अधिक लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

एमबीए चहावाला, डॉली चहावाला यांच्यानंतर मॉडेल चहावाली आता चर्चेत आली आहे.  डॉली चहावाल्याने तर बिल गेट्स यांना चहा पाजून जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. एमबीए चहावाल्यानेही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवली. सध्या मॉडेल चहावाली सोशल मीडियावर भाव खावून जात आहे. 

आपल्या स्टायलिश हटके अंदाजावामुळे ती लक्ष वेधून घेत आहे. लखनौमध्ये एका टपरीवर ती चहा विकते. सध्या तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत दिसत आहे की मॉडेल चहावाली स्कूटीवर येते आणि आधी मॅगी बनवली. त्यानंतर गुलाब प्लेवरचा चहा बनवते. चहा तयार झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांची त्यावर गार्निश करते आणि आपल्या हाताने लोकांना चहा देते. 

(नक्की वाचा-  OLA चे मालक आणि कुणाल कामरा भिडले, ई-स्कूटरवरून नेमकं काय झालं?)

इन्स्टाग्रामवरील thehungrypanjabi च्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये चहाच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. या व्हिडिओवर यूजर्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. एक कोटीहून अधिक लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. 

कोण आहेत 'मॉडल चायवाली'?

सिमरन गुप्ता असं या मॉडल चहावालीचं नाव आहे. सिमरन मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची आहे. सिमरनने मिस गोरखपूर स्पर्धा देखील जिंकली आहे. सिमरन आधी मॉडलिंग करत होती. काही जाहिरातीमध्ये काम करण्याची संधीही तिला मिळाली. मात्र कोरोनामुळे तिच्या मॉडलिंग करिअरवर परिणाम झाला. 

Advertisement

(नक्की वाचा - Inspirational Story : सायकलही चालवता येत नव्हती, आता बनली कॅब ड्रायव्हर; परिस्थितीने सगळं शिकवलं)

घराची जबाबदारी तिच्यावर असल्याने तिने लखनौ येथे स्वत:चा चहाचा व्यवसाय सुरु केला.  एमबीए चहावाला आणि पटनाच्या ग्रॅज्युएट चहावाली यांच्याकडून तिला या व्यवसायात उतरण्याची प्रेरणा मिळाली. सिमरन सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. इन्टाग्रामवर सध्या तिचे 15 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

Topics mentioned in this article