केस ओढले-कपडे फाडले, मुख्याध्यापिका-शिक्षिकेमध्ये फ्री स्टाइल हाणामारी; VIDEO VIRAL

VIRAL VIDEO: शाळेमध्ये उशीरा येण्याबाबत मुख्याध्यापिकांनी शिक्षिका गुंजा चौधरी यांना फटकारले. यानंतर दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
शाळेच्या मुख्याध्यापिका-शिक्षेकमध्ये तुफान हाणामारी

VIRAL VIDEO: शाळेच्या मुख्याध्यापिकेने (School Principal) शाळेतीलच शिक्षिकेला (School Teacher) बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग्रा येथील एका प्राथमिक शाळेमध्ये 3 मे रोजी ही घटना घडली आहे. दोघींमध्ये झालेल्या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

शाळेमध्ये उशीरा येण्याबाबत मुख्याध्यापिकांनी शिक्षिका गुंजा चौधरी यांना फटकारले. यानंतर दोघींमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. मुख्याध्यापिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत शिक्षिकेने दावा केला की, गेल्या चार दिवसांपासून मुख्याध्यापिकाही उशीराच येत आहेत. वादविवादानंतर या दोघींनी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

(नक्की वाचा: ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती)

पाहा VIDEO

दोघींही एकमेकींना कशा पद्धतीने मारहाण करत आहेत, हे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता. मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये भांडण झाले, एकमेकींना शिवीगाळ केली आणि त्यानंतर हाणामारी देखील केली. दोघींमधील वादाने टोक गाठल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघींचें भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

Advertisement

(नक्की वाचा: स्वातंत्र्याची भावुक करणारी कहाणी, 50 वर्षे रुग्णालयात असणाऱ्या भावासाठी ताईचा संघर्ष)

शिक्षिकेने मुख्याध्यापिकेचे चक्क कपडे फाडल्यानंतर दोघींमधला वाद संपुष्टात आला. पण यास प्रत्युत्तर म्हणून मुख्याध्यापिकांनी शिक्षिकेचे केस ओढले. यादरम्यान शिक्षिकेच्या डोळ्याला गंभीर दुखापत देखील झाली. सिकंदरा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोघींनीही एकमेकींविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याने अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

VIDEO: Flood । नागपूर महापालिकेनेच केले अनधिकृत बांधकाम

Topics mentioned in this article